उर्फीनं जे केलंय त्यात काही चुकीचं नाही, अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 48 Second


मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी जावेद(Urfi Javed) आणि भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, असं दिसतंय. या वादावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी(Amruta Fadnvis) प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisements

अमृता फडणवीस यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एक स्री म्हणून तिनं जे काही केलं आहे ते काही चुकीचं नाही. तिनं जे काही केलं आहे ते स्वत:साठी केलं आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

आता अमृता यांच्या या प्रतिक्रियेवरून उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. तिनं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, अरे यार, देवेंद्रजींचा पण सपोर्ट नाही आता.

एकीकडं उर्फीला तिच्या कपड्यांमुळं बेड्या ठोकण्याची मागणी करणाऱ्या चित्रा वाघ या भाजपच्याच आहेत तर दुसरीकडं मात्र भाजपच्या एका प्रमुख नेत्याच्या पत्नीनं हे वक्तव्य केल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, या सगळ्यांत सोशल मीडियावर मात्र विविध चर्चांणा उधाण आलं आहे. काहीजण उर्फीला ट्रोल करत आहेत तर काहीजण तिला सपोर्टही करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *