उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले 62 लाखांच्या अपसंपदेत


नांदेड(प्रतिनिधी)-उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक 19 मुदखेड येथील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आणि त्यांची पत्नी अपसंपदेच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या कायदेशीर तुलनेत 61 लाख 23 हजार 779 रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी दोघांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ही अपसंपदा भ्रष्टाचाराचीच असते.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक 19 मुदखेड येथून वर्ग-1 चे उपविभागीय अधिकारी नारायण यशवंत राऊत यांचे वय 62 वर्ष आहे. म्हणजे चार वर्षापुर्वी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याविरुध्द अपसंपदा जमवल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे 1 जुलै 2001 ते 5 सप्टेंबर 2019 या कालावधीतील उघड चौकशी झाली. या चौकशीमध्ये त्यांनी आपली पत्नी सौ.सुनिता नारायण राऊत वय 54 वर्ष यांच्या नावे आणि आपल्या नावे त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 40.43 टक्के किंमतीची बेहिशोबी मालमत्ता जमवली. या मालमत्तेचा एकूण आकडा रुपयांमध्ये 61 लाख 23 हजार 779 रुपये असा होता. उघड चौकशी पुर्ण झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक संदीप बापूराव थडवे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात नारायण यशवंत राऊत आणि त्यांच्या पत्नी सौ.सुनिता नारायण राऊत या दोघांविरुध्द बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 13(1)(इ) सह 13(2), भारतीय दंड संहितेच्या कलम 109 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 13(1)(ब) सह 13(2), 12 नुसार गुन्हा क्रमांक 273/2024 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पर्यावेक्षण अधिकारी पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक गजानन बोडके हे करणार आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी याच्याकडे अपसंपदा संपादीत केल्याची खात्रीलायक माहिती असेल तसेच लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी हे स्वत: किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती (एजंट) हे शासकीय काम करुन घेण्यासाठी कायदेशीर फि व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास याबाबतची माहिती जनतेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. जनतेसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 वर याची माहिती देता येईल.


Post Views: 584


Share this article:
Previous Post: वसमत येथील देवस्थानाच्या जमीनीवर होणारे बांधकाम तात्काळ थांबवा-मागणी

June 27, 2024 - In Uncategorized

Next Post: तहसीलदार बोथीकर सुट्टीवर विभागीय चौकशी सुरू असलेले संजय वारकडच तहसीलदार

June 27, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.