August 19, 2022

उमरा कापसे ते जवळा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा | संतोष भाऊ कापसे पाटील

Read Time:1 Minute, 13 Second

वाशिम : उमरा कापसे ते जवळा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. याची तातडीने दखल घेत राष्ट्रवादी काग्रेस पार्टी तालूका उपाध्यक्ष वाशिम यांनी पाठ बंधारे विभागाच्या अधिका-यांना दूरध्वनी करून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी विनंती केली आहे.

पावसामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. हा रस्ता धोकादायक झाल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन हा रस्ता वाहतूक योग्य करीत नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी विनंती संतोष भाऊ कापसे पाटील राष्ट्रवादी काग्रेस पार्टी तालूका उपाध्यक्ष वाशिम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 3 =

Close