उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!

Read Time:1 Minute, 50 Second


मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. समृद्धीसारखा नागपूर गोवा महामार्ग तयार करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नागपूर ते गोवा हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडून जाईल. कनेक्टिव्हीटी वाढवायची आहे. राज्यातील कुठल्याही भागात 8 ते 10 तास पोहचता येईल, असे रस्ते तयार करायचे आहेत, असंही ते म्हणाले.

मी नरेडको विदर्भला सरकारच्या वतीनं पूर्ण सहकार्य मिळेल. बिल्डर्ससोबत सामान्य माणसांचं हित जपणारी नरेडको ही संघटना आहे. व्यवसायास समोर असलेल्या अडचणी मांडा आम्ही त्या सोडऊ. मी मुख्यमंत्री असताना देशातलं पहिलं रेरा आपण महाराष्ट्रात सुरु केला, असंही त्यांनी सांगितलं.

नवीन सरकार हे फायलींवर बसणारे नाही. हे काम करणारे सरकार आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. दोन सव्वादोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे फास्ट चांगला विकास करायचा आहे. आम्हाला 20-20 ची मॅच खेळायची आहे, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?”

‘…तर शिंदे सरकार कोसळणारच’; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 5 =