June 29, 2022

उद्या लॉकडाऊन वाढविण्याबाबतचा निर्णय

Read Time:2 Minute, 23 Second

मुंबई : राज्यात २४ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू आहे. १५ मेपर्यंत या लॉकडाऊनची मुदत आहे. ती मुदत वाढणार की लॉकडाऊन संपणार याविषयींच्या चर्चेला उधाण आलेले असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की लॉकडाऊनबाबत उद्याच्या (बुधवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल.

काही निर्बंध कमी अधिक प्रमाणात बदलले जातील पण संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याबाबतची शक्यता त्यांनी फेटाळली आहे. सगळे लगेच १०० टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असे माझा अंदाज आहे. पण पूर्ण लॉकडाउन काढून १०० टक्के मोकळिक होईल असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले आहे.

राज्यात सध्या ६ लाख अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. जमेची बाजू ८७% बरे होण्याचा दर आहे. टेस्टिंग कमी झालेले नाही. दरदिवशी दोन लाख चाचण्या होत आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, १ कोटी ८४ लाख जणांना लस मिळाली आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी केंद्राकडून लस येते.

कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध. सेकंड डोस ५ लाख जणांना द्यायचा आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोव्हॅक्सिन पावणे तीन लाख उपलब्ध आहे आणि केंद्राने दिलेले ३५ हजार डोस आता ४५ वर्षांवरील व्यक्तींना देणार. केंद्राकडे लस साठा उपलब्ध नाही आहे. टास्क फोर्सशी चर्चा करून १८ ते ४५ वयोगटासाठीचे लसीकरण कमी वेगाने करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 + one =

Close