January 22, 2022

उद्यापासून देशात 18 ते 44 वयोगटाच मोफत लसीकरण

Read Time:1 Minute, 29 Second

पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला संबोधित करताना 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याबाबत घोषणा केली होती. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मेगा प्लान तयार केला आहे.

उद्यापासून (21 जून) देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होणार आहे.फेरीवाले, रिक्षाचालक यांसारख्या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे.

तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी काही टक्के रजिस्ट्रेशन तर काही टक्के वॉक-इन स्वरुपात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठीही काही ठराविक वयोगटांचे टप्पे केले जातील. 30 ते 44 किंवा 25 ते 44 असे वयोगटाचे टप्पे करुन लसीकरण मोहीम राबवली जाऊ शकते.

तर आठवड्यातील तीन दिवस वॉक-इन लसीकरणासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. या दिवशी लसीकरण केंद्रांवर 100 टक्के वॉक-इन लसीकरण केलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =

Close