May 19, 2022

उत्तराखंडमध्ये भाजपची स्वनेत्यावर कारवाई

Read Time:2 Minute, 22 Second

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या राजकारणात हरक सिंह रावत यांच्यावर भाजपने केलेल्या कारवाईमुळे उलट सुलट चर्चा रंगली आहे. आता भाजप आणि हरक सिंह रावत यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसशी जवळीक वाढल्याने पक्षाने हरक सिंह रावत यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे हरक सिंह रावत यांनी आपल्याशी याबाबत एकदाही न बोलता हा निर्णय घेतला गेल्याचे म्हणत मी काँग्रेसमध्ये जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भाजपने केलेल्या कारवाईनंतर त्यांना अश्रूही अनावर झाले. ते म्हणाले की, मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो नसतो तर चार वर्षांपूर्वीच भाजपचा राजीनामा दिला असता. मला मंत्रीपदात रस नाही. मला फक्त काम करायचे आहे. एका बाजुला आपण काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे हरक रावत म्हणतायत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, रावत यांच्याकडून पक्षावर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केला जात होता. यामध्ये ते कुटुंबातील सदस्यांसाठी तिकिटाची मागणी करत होते. मात्र आमची धोरणे वेगळी आहेत आणि निवडणुकीत कुटुंबातील एकाच सदस्याला तिकिट दिले जाऊ शकते असेही ते म्हणाले.

हरक रावत यांनी त्यांची सून अनुकृती रावत यांच्यासाठी तिकिट मागितल्याचे सांगितले जात आहे. अनुकृतीचे आणि हरक सिंह रावत यांचा मुलगा तुषित यांचे २०१८ मध्ये लग्न झाले. दोन्ही घरचे आधीपासूनच कौटुंबिक संबंध होते. दरम्यान, हरक स्ािंह रावत यांच्या लॉकडाऊनमधील प्रचाराची धुरा अनुकृती सांभाळत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 − 9 =

Close