January 19, 2022

ईडीच्या माध्यमातून सरकारलाअस्थिर करण्याचा

Read Time:1 Minute, 39 Second

औरंगाबाद : ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम भाजपकडून केला जात आहे, असा आरोप आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी औरंगाबादेत केला. राणा यांच्या विरोधात जात पडताळणी संदर्भात कारवाई झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आमदार रवी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली आणि ही कारवाई झाल्याचेही ते म्हणाले. मंत्री वडेट्टीवार औरंगाबादमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ईडीने अडसुळांवरील केलेली कारवाई असोकिंवा इतरांवर केलेली कारवाई हा सरकारला अस्थिर करण्याचा डाव आहे. सुपारी घेऊन काही जण काम करत आहेत. काय बोलतो आहोत, काय आरोप याचे भान त्यांना नाही. अशा बदलाच्या भावनेतून, सुडबुद्धीने राजकारण कधी नव्हते, ही पद्धत नव्याने राज्यात, देशात रुजते आहे. सुडबुद्धीने काम केले जात आहे हे जनता ओळखून आहे. अडसुळांवरील कारवाई ही अशाच प्रकारची आहे. अशा कारवाईमुळे महाविकास आघाडीला काही धोका नसून सरकार अधिक मजबूत होईल असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + 8 =

Close