इस्त्राईलमध्ये कोरोनाची पाचवी लाट

Read Time:2 Minute, 3 Second

लंडन : दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने सर्वांचीच धाकधुक वाढवली आहे. ब्रिटनमध्ये तर सध्या कोरोनासोबतच ओमिक्रॉन हातपाय पसरताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात ओमिक्रॉनच्या १२ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर इस्त्राईलमध्ये कोरोनाची पाचवी लाट आली आहे. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे.

यूके हेल्थ सिक्योरिटी एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये रविवारी कोरोनाचे ८२,८८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १२,१३३ रुग्ण ओमायक्रॉनचे होते. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३७,१०१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे, ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये शुक्रवारी ९३,०४५, तर शनिवारी ९०,४१८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

बाधितांचा आकडा आणखी वाढणार
ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांचे म्हणणे आहे की, नवा व्हेरियंट अत्यंत वेगाने पसरत आहे. त्यांनी शंका व्यक्त केली आहे की, ओमिक्रॉन बाधितांचा आकडा आणखी जास्त असू शकतो. त्यांचे म्हणणे आहे की, ओमिक्रॉनचे सध्या जितके रुग्ण आढळून येत आहेत. त्यांची संख्या याहून अधिक असू शकते. कारण अद्याप अनेक लोक असे आहेत, ज्यांनी टेस्ट केलेल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + ten =