इतवारा गुन्हे शोध पथकाने दोन युवकांना पकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक खंजर पकडला


 

नांदेड,(प्रतिनिधी)-इतवारा उपविभागातील विशेष गुन्हे शोध पथकाने दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल,दोन जिवंत काडतुसे आणि एक खंजीर अशी घातक हत्यारे जप्त करून त्यांच्याविरुद्ध हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

17 जून रोजी दुपारी

1. 45 वाजता इतवारा उपविभागातील विशेष गुन्हे शोध पथक गस्त करत असताना त्यांना वाजेगाव परिसरात शेख महबूब उर्फ गोरु बाबू (23) राहणार बिलाल मज्जित जवळ वाजेगाव हा युवक भेटला या युवकाकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे सापडली. तसेच दुपारी 3.30 वाजता वाजेगाव वळण रस्त्याच्या पुलाखाली प्रेमसिंघ धरमसिंघ रामगडीया (23) राहणार शिकारघाट तालुका मुदखेड हा युवक सापडला. त्याच्याकडे एक खंजीर सापडले. या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये अनुक्रमे गुन्हे क्रमांक 491 आणि 492 दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक आदींनी हत्यारे पकडणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे,चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लूरोड, श्रीराम दासरे,सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचे कौतुक केले आहे.


Post Views: 410


Share this article:
Previous Post: इलेक्शन का रिझल्ट तथा न्युज चैनल तथा सोशल मीडिया पर चल रही चर्चा

June 18, 2024 - In Uncategorized

Next Post: अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला पोलीस कोठडी

June 18, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.