May 19, 2022

इंडिया गेटवर बसविणार नेताजी बोस यांचा पुतळा

Read Time:2 Minute, 15 Second

नवी दिल्ली : दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच येत्या २३ जानेवारीला नेताजींच्या जंयतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर ग्रॅनाइटपासून बनवलेला नेताजींचा भव्य पुतळा बसवला जाईल हे सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जोपर्यंत नेताजींचा भव्य पुतळा तयार होत नाही तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा तिथेच राहणार असल्याचेही ते म्हणाले.

देशाच्या इतिहासात वीर जवांनांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती दुस-या ठिकाणी हालवण्यात आली आहे. भारताच्या शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ गेल्या ५० वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असलेली अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन होणार आहे. त्यानंतर आता अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − twelve =

Close