January 21, 2022

आ. परिचारक यांच्या गाडीवर ऑईलफेक

Read Time:2 Minute, 47 Second

भाजपाचे विद्यमान विधानपरिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांनी मागील तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी सैनिकांच्या पत्नीबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व अपशब्दाचा जाहीर निषेध व्यक्त करत आ.प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर मंगळवार दि.९ नोव्हेंबर रोजी,सकाळी १०:३० वा.आ. प्रशांत परिचारक बार्शीकडे जात असताना रिधोरे.ता.माढा येथे माजी सैनिक बापू भिमराव गायकवाड यांनी परिचारक यांची गाडी अडवून,भारत माता की जय,वंदे मातरम् अशा घोषणा देत,त्यांच्या गाडीवर काळे ऑइल फेकत आपला निषेध व्यक्त केला.

जिल्हापरिषद,तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील जाहीर सभेमध्ये सैनिक व त्यांच्यापत्नीबद्दल आ.प्रशांत परिचारक यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.आ.प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर देशरक्षणासाठी तैनात असणा-या सैनिकांच्याबद्दल सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या भावना दुखावणारे विधान व्यक्त केले होते.त्याचाच निषेध म्हणून आ.प्रशांत परिचारक यांच्या गाडीवरही ऑईल फेक करण्यात आली. यावेळी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात बघ्यांची गर्दी जमलेली होती.

आ.प्रशांत परिचारक बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी पंढरपूरवरुन बार्शीला निघाले असताना बार्शी कुर्डवाडी रोडवर रिधोरे येथे माजी सैनिक बापू गायकवाड यांनी त्यांच्या गाडीला आपली सायकल आडवी लावून गाडी थांबवली व भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणा देत आमदार परिचारक यांच्या गाडीवर यांच्या गाडीवर काळे ऑईल टाकत आपला तीव्र निषेध व्यक्त केला.
आ. परिचारकांनी सैनिकांची माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्ते बापू गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + seventeen =

Close