
आ. निलेश लंके यांचा पारनेर मतदारसंघ आता नव्याने चर्चेत! जाणिवपुर्क कोरोना रुग्ण वाढवल्याचा दावा?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे आ. निलेश लंके यांचा पारनेर तालुका पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रात १४ जिल्ह्यांतील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे. अशांतच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. परिणामी पारनेर तालुक्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहे .
मात्र पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या वाढण्याचे कारण लोकप्रतिनिधींचे मोकाट वागणे आहे. असा दावा भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे. वसंत चेडे यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांचा रोख निलेश लंकेंकडे असल्याचे स्पष्ट जाणवते.
लोकप्रतिनिधी बेफाम वागत आहेत. प्रचंड गर्दीच्या राजकीय सभा, कार्यक्रम घेतले जात आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आता रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे निर्बंध कडक करुन हे महाविकासआघाडी सरकार सर्वसामान्यांचे जीणे मुश्कील करत असल्याचेसुद्धा ते यावेळी म्हणाले.
लोकप्रतिनीधींचा खाजगी कोवीड सेंटर निर्मीतीचा प्रयत्न सुरु आहे. परंतू शासकीय कोवीड सेंटर असतांना खाजगी कोवीड सेंटरचा आग्रह कशाला? असा सवाल त्यांच्याकडून ऊपस्थित करण्यात आला.
निलेश लंके त्यांच्या ११०० खाटांच्या कोवीड सेंटरमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते. परंतू भाजपकडून करण्यात आलेल्या या दाव्यांमुळे पारनेर तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे.