आ. नितेश राणे यांना हायकोर्टाचा झटका

Read Time:1 Minute, 26 Second

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. हा नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता.

यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, उच्च न्यायालायाकडूनही नितेश राणेंना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला. दरम्यान, नितेश राणेंना साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − one =