January 21, 2022

आॅस्ट्रेलिया अंतिम फेरीत

Read Time:4 Minute, 21 Second

पाकचा विजयी रथ रोखला, रविवारी न्यूझीलंडशी अंतिम लढत
दुबई : टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसºया उपांत्य सामन्यात आॅस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत आॅस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.
आॅस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने आॅस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९ व्या षटकात विजय मिळवला. १९ व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाºया वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. आॅस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.
कप्तान आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आॅस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने फिंचला पहिल्याच चेंडूवर पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी संघाला आधार दिला. सहा षटकात आॅस्ट्रेलियाने १ बाद ५२ धावा केल्या. पुढच्याच षटकात फिरकीपटू शादाब खानने पाकिस्तानला दुसरे यश मिळवून दिले. त्याने मार्शला झेलबाद करत भागीदारी मोडली. मार्शने ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या. मार्शनंतर आॅस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. दुसºया बाजूला वॉर्नर झुंज देत होता. पण शादाब खानने ११ व्या षटकात गोलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला यष्टीपाठी झेलबाद केले. वॉर्नरनचे अर्धशतक हुकले. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. या पडझडीनंतर मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांनी धावफलक हलता ठेवला. सुरुवातीला स्टॉइनिसने फटकेबाजी केली. आॅस्ट्रेलियाला १२ चेंडूत २२ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून १९ वे षटक आफ्रिदीने टाकले. या षटकात हसन अलीने वेडचा झेल सोडला. पुढच्या तीन चेंडूवर वेडने लागोपाठ तीन षटकार ठोकत सामना आपल्या नावावर केला. या षटकात आफ्रिदीने २२ धावा खर्च केल्या. वेडने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ तर स्टॉइनिसने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावा ठोकल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने २६ धावांत ४ बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 6 =

Close