January 21, 2022

आसना पुलावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला

Read Time:2 Minute, 57 Second

नांदेड: शहरालगत असलेल्या आसना पुलावर कठड्यावर जावून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जावून त्यामुलाचा जिव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. सदर घटना बुधवारी सायंकाळी घडली. आसना नदीला मोठ्या प्रमाणात पुर आला असून शहरातील एका ३२ वर्षीय युवकांनी आत्महत्या करण्याच्या बेताने बुधवारी सायंकाळी पुलाच्या कठड्यावर जावून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला.

सदर माहिती सेनेचे जिल्हाप्रमुख कोकाटे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली. व महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जिव रक्षकांना पाचारण केले. तहसिलदार व विमानतळ पोलिस ठाण्याला घटनेचे माहिती त्यांनी तात्काळ दिली. व सदर युवकास आत्महत्या करु नकोस तुला लवकरच वर काढण्यात येईल असे कोकाटे यांनी सांगितले. त्यानंतर तात्काळ अग्निशामक दलाचे प्रमुख रईस पाशा यांना भ्रमणध्वनी करुन घटनास्थळी बोलावून घेतले. यानंतर रईस खान यांनी आपल्या कर्मचा-यांच्या मदतीने सदरील युवकास क्रेनच्या सहाय्याने वर काढण्यात आले. घटनास्थळी विमानतळ पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक आले होते. त्यांनी देखील या कामात मदत केलेल्या नंतर त्या युवकाला ताब्यात घेतले.

आसना नदीवर तिसरापुल बांधण्याची तयारी आहे. तत्पुर्वी दोन पुल तयार झाले आहेत. त्या एका पुलावरुन युवकांनी जिव देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नशीब चांगले असल्यामुळे तो पुलाच्या कठड्यावर अडकून पडला. वरही जाता येईना आणि खाली उडी मारा वाटेना अशी अवस्था झाल्यानंतर युवक ढसाढसा रडत मोठमोठ्याने ओरडत होता. ही घटना खबर शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या कानी पडताच त्यांनी तात्काळ दखल घेवून त्या मुलाचा जिव वाचविला. यावेळी इंजि.देशमुख, सुरेश हाटकर, यांच्यासह महापालिकेच्या अग्निशमक दलातील कर्मचा-यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − 4 =

Close