January 19, 2022

आश्रमातून तीन बालके फरार

Read Time:2 Minute, 46 Second

नांदेड: प्रतिनिधी

जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असुन, वाडी पाटी जवळील लहुजी साळवे निराश्रीत बालकाश्रमातील तीन अल्पवयीन मुले गेल्या दोन दिवसापासून अचानक पळून गेले आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत चालली असुन, ही मोठी चिंतेची बाब बनत चालली आहे. जिल्ह्यात दररोज लुटमारख जबरी चोरी, घरफोडी, मारहाण आशा घटना खुलेआम घडत आहेत. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील दोन दिवसापुर्वीच मित्रांनी पार्टी दरम्यान आपल्या मित्राचा खुन केल्याची घटना घडली. तर दिवसा ढवळ्या शहरात हत्यार घेऊन गुंड प्रवृतीचे लोक फिरताना दिसत आहेत. यांच्यावर पोलिसांचे कु ठलेही अंकु श राहिले नसुन अगदी बिनदास्त पणे गुन्हेगार मोकाट फिरताना दिसत आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे मोकाट आहेत. पोलिसांकडून यांच्या विरूद्ध कुठलीही मोठी कारवाई होताना दिसत आहे. पोलिसांच्या आशा निष्क्रीय कामगीरीवर नागरीक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. दरम्यान वाडी पाटी जवळील लहुजी साळवे निराश्रीत बालकाश्रमातील तीन अल्पवयीन बालके गायब झाले असून या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घोरबांड व त्यांचे सहकारी मुलांचा शोध घेत आहेत. आश्रमात राहत असलले रीहान वय १२ वर्षे, अभिजीत इंद्रजीत भोसले वय १४ वर्षे आणि महेश तुळशीदास यादव वय १४ वर्षे ही तीन बालके गायब झाली आहेत. या प्रकरणी फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोउपनि कोरे हे करीत आहेत. दरम्यान वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 5 =

Close