आर्ट अॉफ लीव्हींग परिवाराचे रक्तदान शिबीर संपन्न !आ. राजेंद्र पाटणींनी दिली शिबीरांस भेट

Read Time:3 Minute, 45 Second

सद्यस्थितीत कोरोनाकाळात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याअगोदर जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अावाहनाला प्रतिसाद देत कारंजा आर्ट अॉफ लीव्हींग परिवाराच्यावतीने दि. १३ जुन रोजी येथील जे.सी.चवरे हायस्कुलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आर्ट अॉफ लीव्हींग परिवाराचे संस्थापक श्री.श्री. रविशंकर यांच्या प्रतिमेस हारार्पन करीत रक्तदान शिबीराचे ऊद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. अजय कांत, डॉ. शार्दुल डोणगावकर, जेष्ठ पत्रकार गोपाल भोयर, संत गाडगे बाबा रक्तपेढीचे संचालक डॉ. कवीमंडल, देवव्रत डहाके, आशिष बंड यांची प्रमुख ऊपस्थिती होती.

रक्तदान शिबीरांत जे.सी. चवरे हायस्कुलमधील सर्व शिक्षकवृदांनी रक्तदान करीत आपले सामाजिक दायीत्व जोपासले. तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा शिबीरांत ऊपस्थिती लावत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. पुरुषांसोबतच महिलांनीसुद्धा या सामाजिक ऊपक्रमात सहभाग घेत एकुन पाच महिलांनी रक्तदान केले.

एकुण ७८ रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधीलकी जोपासली. तसेच प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्रासह अंकुर सीड्सच्यावतीने बॅग देऊन सन्मानित करण्यात आले.

आ. राजेंद्र पाटणी यांनी या रक्तदान शिबीरांस धावती भेट देत सर्व रक्तदात्यांचे त्यांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल कौतुक केले. प्रशांत स्वामी, राजेश फुलाडी, प्रज्वल गुलालकरी, निलय बोन्ते, भारत हरसुले, शैलेश लोखंडे यांनी या रक्तदान शिबीरासाठी विशेष परिश्रम घेतले. सरतेशेवटी आर्ट अॉफ लीव्हींग परिवाराचे डॉ. सुशील देशपांडे यांनी सर्व रक्तदात्यांचे व जे.सी. चवरे हायस्कुलचे आभार मानले.

रक्तदात्यांपैकी किशोर धाकतोड यांनी आपले ६१ वे रक्तदान केले. वयाच्या २२ व्या वर्षापासून मी रक्तदान करत आहे. आज माझे ६१ वे रक्तदान पूर्ण झाल्याचा मला अभिमान आहे. तसेच युवकांनीसुद्धा पुढे येत रक्तदान करावे असे आवाहन दै. मातृभूमीच्यावतीने त्यांनी केले.

शुभम संपळे या युवकाने आपल्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान केले. यावेळी त्याच्या मित्रपरिवारानेसुद्धा रक्तदान करत त्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये सविज जगताप, सम्यक फुरसुले, संकेत परसवार, हर्षल मुक्कमवार, ऋतुजा फुरसुले ई. युवका-युवतींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten + 7 =