आर्टलेरी नाशिक, ईएमई जलंधरसह डेक्कन हैदराबाद विजयी

Read Time:4 Minute, 42 Second

नांदेड:प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड व सिल्वर कप हॉकी चषक स्पर्धेत गुरुवारी कॉर्प्स ऑफ सिंग्नल जलंधर संघावर डेक्कन हैदराबाद संघाचा विजय स्पर्धेत चुरशी निर्माण करून गेला. आर्टलेरी नाशिक संघाने नांदेडच्या चार साहबजादा हॉकी क्लबवर ५ वि. ० असा मोठा विजय खिश्यात घातला. तर इ.एम.इ. जलंधर आणि भोपाल संघानी विजय साजरा केला.

पहिला सामना एस. एस. अमरावती आणि इलेवन स्टार अमरावती संघामध्ये खेळला गेला. दोन्ही संघानी परस्पराविरुद्ध दोन दोन गोल करत सामना अनिर्णीत राखला. एस. एस. अमरावती तर्फे गुफरान शेख याने तर त्याच्या पाठोपाठ नदीम शेख याने मैदानी गोल करत आघाडी मिळवली होती. पण इलेवन स्टार तर्फे ४९ व्या मिनिटाला निक्की आणि ५१ व्या मिनिटास रिजवान याने गोल करत सामना अनिर्णीत ठरवला.

आजचा दूसरा सामना आर्टलेरी नाशिक आणि चार साहबजादा हॉकी अकादमी दरम्यान खेळला गेला. नाशिक संघाने संजय टीडू यानी खेळाच्या तिस-याच मिनिटाला केलेल्या मैदानी गोलाने आघाडी घेतली. नंतर नाशिक संघाने पुढे आक्रमक खेळास सुरुवात केली. २० व्या मिनिटास बलकारसिंघ, ३७ मिनिटाला चरणजीतसिंघ, ४२ व्या मिनिटाला पुन्हा बलकारसिंघ आणि ५८ व्या मिनिटाला मनप्रीतसिंघ यांनी गोल केले. या सामन्यात नाशिक संघाचा निर्विवाद एकतरफा विजय झाला. तीसरा सामना इ. एम. इ. जलंधर आणि इटारसी हॉकी क्लब दरम्यान खेळला गेला. जलंधर संघाने ३ वि. १ गोल अंतराने सामना सहज जिंकला. जलंधर संघातर्फे सातव्या मिनिटाला मिळालेल्या एका पेनल्टी कार्नरचे रूपांतरण अमनजोत भंभर याने गोलात करून संघाला आघाडी दिली. नंतर १८ व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी कार्नर वर अमित सैनी याने गोल केले. तर गुरजिंदरसिंघ याने ३२ व्या मिनिटाला मैदानी गोल करत सामन्यावर पकड घट केली. इटारसी संघाने संघर्षपूर्ण खेळ केला आणि ५१ व्या मिनिटाला मिळालेल्या एका पेनल्टी कार्नर मध्ये गोल करत परतण्याचा प्रयत्न केला. शेवटी जलंधरला विजय मिळाले.

आजचा चौथा सामना रिपब्लिकन मुंबई आणि भोपाल इलेवन संघात खेळला गेला. अति संघर्षपूर्ण खेळात शेवटी भोपाल संघाच्या नशिबी विजय साजरा करण्याची संधी मिळाली. मागील दोन्ही सामन्यात भोपाल संघाला मोठ्या गोल फकार्ने पराभव सहन करावा लागला होता. आज भोपाल संघाने २९ मिनिटाला इमाद उद्दीन याने केलेल्या गोलाच्या जोरावर विजयाचा अस्वाद घेतला. आज झालेल्या पाचव्या सामन्यात कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधर आणि डेक्कन हैदराबाद या बलाढ्य संघात सामना रंगला.

डेक्कन हैदराबाद संघाने २८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कार्नरचे रूपांतरण गोलात केले. बी. रामकृष्णा याने गोल केला. ५१ व्या मिनिटाला मिळालेल्या एका पेनल्टी स्ट्रोक मुळे डेक्कन संघाला दूसरे गोल करता आले. मो. अलीम याने गोल केला. जलंधरला पराभव पाचवावा लागला. संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु असलेलेया सामन्यात एच. पी. एस. जी. पंचकुला संघाने नांदेडच्या खालसा यूथ क्लबवर ३ वि. ० अंतराने सामना जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 5 =