January 19, 2022

आरपीआय महिला पदाधिकारी आंबेकरची हत्या

Read Time:1 Minute, 39 Second

नाशिक : नाशिकमध्ये भीषण हत्याकांड घडलं आहे. ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर असं असल्याची माहिती समोर आली आहे. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या.

रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल २० ते २५ वार केले. सोबत राहणा-या इसमानेच हत्या केली असल्याचा संशय आहे. संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलिस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + five =

Close