January 19, 2022

आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ

Read Time:3 Minute, 20 Second

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. यादरम्यान कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरु आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आज एका अशा मिशनची सुरुवात होत आहे, ज्यामध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला आनंद होत आहे की, आजपासून आयुषमान भारत डिजिटल मिशन संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आले आहे. हे मिशन देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांच्या उपचारांत येणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. पुढे बोलाताना ते म्हणाले की, १३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाईल सब्स्क्राईबर्स, जवळपास ८० कोटी इंटरनेट युजर्स, जवळपास ४३ कोटी जनधन बँक खाती एवढे मोठे कनेक्टेड इंफ्रास्ट्रक्चर जगात कुठेच नाही आहे. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर रेशनपासून प्रशासनापर्यंत, पारदर्शी पद्धतीने सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवत आहे.

टेलिमेडिसिनचा अभूतपूर्व विस्तार
कोरोना काळात टेलिमेडिसिनचाही अभूतपूर्व विस्तार झाला आहे. ई-संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास सव्वा कोटी रिमोट कंसल्टेशन पूर्ण झाले आहे. ही सुविधा दररोज देशातील दूर-दूर राहणा-या हजारो देशवासियांना घरबसल्या शहरांतील मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांशी कनेक्ट करणार आहे.

हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित राहणार
सर्वांना मोफत अभियानातंर्गत भारताने आज जवळपास ९० कोटी लसीचे डोस दिले आहेत. त्याचा रेकॉर्डही उपलब्ध आहे. यामध्ये को-वीन अ‍ॅपची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आयुष्मान भारत-डिजिटल मिशन, आता संपूर्ण देशातील रुग्णालयातील डिजिटल हेल्थ सोल्यूशंसना एकमेकांशी कनेक्ट करेल. यातंर्गत देशवासियांना आता एक डिजिटल हेल्थ आयडी मिळणार आहे. प्रत्येक नागरिकांचे हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 2 =

Close