August 19, 2022

आयसीएसई दहावी बोर्डचा निकाल आज

Read Time:2 Minute, 6 Second

नवी दिल्ली: आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल रविवार दि. १७ जुलै रोजी जाहीर होणार आहे. सेमिस्टर एक आणि सेमिस्टर असं दोन समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर टाकून हा निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.

काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन उद्या आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे २०२२ मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक आणि सत्र दोन या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक किंवा सत्र दोन मधील एकही परीक्षा दिली नसेल तर अनुपस्थित म्हणून निकाल येईल. शाळा सुद्धा प्रिन्सिपल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून निकाल पाहू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 3 =

Close