आयटी क्षेत्रातील ३० लाख जणांच्या नोक-या धोक्यात

Read Time:3 Minute, 19 Second

नवी दिल्ली : भारतीय आयटी क्षेत्रामध्ये मोठ्याा उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. एका रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये आयटी क्षेत्रातील तब्बल ३० लाख कर्मचा-यांना आपली नोकरी गमवावी लागेल, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन होत आहे. विशेष करुन टेक-स्पेस, सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन स्वीकारत आहेत. रिपोर्टनुसार, डोमेस्टिक सॉफ्टवेअर कंपनीतील १.६ लाख कर्मचा-यांपैकी ३० लाख लोकांना घरचा रस्ता दाखवला जाईल. यातून या क्षेत्राची वार्षिक १०० अब्ज डॉलरची बचत होईल, असे सांगण्यात आले आहे.

नासकॉमच्या माहितीनुसार, डोमेस्टिक आयटी क्षेत्रामध्ये जवळपास १.६ कोटी लोक काम करतात. त्यातील ९० लाख कर्मचारी कमी कौशल्य असलेले आणि बीपीओमध्ये काम करणारे आहेत. यातील ३० टक्के किंवा ३० लाख कर्मचारी २०२२ मध्ये आपली नोकरी गमावतील. आयटी क्षेत्रामध्ये झालेल्या रोबोट प्रोसेस ऑटोमेशनचा रोबोट प्रोसेस ऑटोमेशन(आरपीए) हा परिणाम असेल असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. जवळपास ७ लाख लोकांचे काम आरपीआय करू लागतील आणि तंत्रज्ञानातील अद्यावतीकरणामुळे इतरांच्या काम करण्याची आवश्यकता लागणार नाही.

अमेरिकेत १० लाख कर्मचा-यांना घरी पाठविले
आरपीआयचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेतील कर्मचा-यांवर झाला आहे. ऑटोमेशनमुळे अमेरिकेत १० लाख कर्मचा-यांना घरी पाठवण्यात आले. पुढील काळात ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रात आमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. आत्ताच याचे संकेत मिळत आहेत. ऑटोमेशनमुळे कंपन्यांचा आर्थिक फायदा वाढणार आहे. शिवाय ऑटोमेशनमुळे २४ तास काम शक्य होणार आहे. याचा परिणाम थेट कंपन्यांच्या उत्पन्नावर होईल.

मॅनपॉवर कमी करण्याची तयारी
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिन्द्रा, कॉग्नीझंट आणि इतर कंपन्या आरपीआय कौशल्यामुळे ३० लाख मॅनपॉवर कमी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे त्यांना १०० अब्ज डॉलर वाचवता येतील. याचा वापर ते आणखी ऑटोमेशन वाढवण्यासाठी करु शकतात. दरम्यान, १९९८ मध्ये आयटी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा १ टक्के होतो, पण आता तो वाढून ७ टक्के झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + fourteen =