January 21, 2022

“आयकर विभागाच्या धाडींनी अजित पवारांना काहीच फरक पडणार नाही” अजितदादांच्या समर्थनार्थ आठवले!

Read Time:2 Minute, 2 Second

केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नेहमिच आपल्या विधानांमुळे चर्वेत असतात. आता त्यांनी चक्क अजित पवारांना समर्थन दर्शवले आहे.

आयकर विभागाकडून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कंपनी आणि घरांवर करण्यात आलेल्या छापेमारीमुळे अजित पवारांचा फारसा फरक पडणार नाही असे विधान त्यांनी केेले आहे.

रामदास आठवलेंचे हे विधान चांगलेच चर्चेत आले असून त्यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांअगोदर आयकर विभागाकडून अजित पवार यांचे निकटवर्तीय तसेच त्यांच्या बहिणींच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवरच रामदास आठवलेंनी हे विधान केले आहे.

एका कार्यालयाच्य‍ा ऊद्घाटनप्रसंगीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारकडून स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे त्यांनी यावेळी खंडन केले. ईडी, सीबीआय या स्वतंत्र संस्था असल्याचे ते म्हणाले.

मुंबईतील एनसीबीच्या कारवाईचे समर्थन त्यांनी केले. तसेच आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये एक प्रभाग एक ऊमेदवार पद्धती असावी अशी मागणी त्यांनी केली. यासाठी उद्या संपूर्ण महाराष्ट्रात रीपाई आंदोलन करणार असल्याचेसुद्धा त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − four =

Close