August 19, 2022

आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही : शिंदे

Read Time:2 Minute, 26 Second

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठा गेम करत शिवसेनेची साथ सोडल्याचं स्पष्ट झालंय. कालपासून ते जवळपास ३५ आमदारांसोबत सुरतला गेले असून शिवसेनेत मोठं बंड समोर आलं आहे.

या घडामोडींनंतर राज्यात मोठी राजकीय खळबळ समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय जारी केला. त्यानुसार एकनाथ शिंदे यांची गटनेतापदावरून हकालपट्टी कऱण्यात आली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांनी निवड झाली आहे.

कालपासून माध्यमं एकनाथ शिंदे यांच्याची संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्यापर्यंत अद्याप कोणीही पोहोचलेलं नाही. ते नॉट रिचेबल आहेत. अखेर एकनाथ शिंदेंनी ट्वीट करून त्यांचा पुढचा मार्ग स्पष्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही.

राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली. यामध्ये शिंदेंची हकालपट्टी झाल्याचं स्पष्ट झालंय.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven − 6 =

Close