“आम्ही दोन हजार कोटींची योजना आणली”

मुंबई | हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न(Maharahstra-Karnataka Border Dispute) चांगलाच लावून धरला आहे. त्याचपाठोपाठ आता अब्दुल सत्तारांच्या(Abdul Sattar) राजीनाम्याची मागणीही विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली आहे. या दोन्ही मुद्द्यांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे सोमवारी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा गेला आहे. सरकार सीमावासियांच्या पाठीशी आहे.
सध्या जे सीमाप्रश्नावर बोलत आहेत, त्यांनीच सीमावासियांच्या योजना बंद केल्या. आम्ही सत्तेत आल्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत, असं म्हणत त्यांनी दोन हजार कोटींची म्हैसाळ विस्तारीकरणाची योजना आणल्याचा दावाही केला.
अब्दुल सत्तार यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षनेत्याच्या प्रकरणाचीही माहिती काढू आणि अब्दुल सत्तारांचीही माहिती काढू.
दरम्यान, सोमवारी सभागृहात सीमाप्रश्नाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) हा भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे.