“आम्ही घरंदाज बायका नवनीत राणांवर बोलणार नाही”

Read Time:1 Minute, 32 Second

 

मुंबई | सरकारला पर्यावरणाचे नियम न पाळल्याने  12 हजार कोटी रुपयांचा हा दंड ठोठावण्यात आला आहे. यावरुनच मुंबई भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टिका केली होती यावरुन शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांला प्रत्युत्तर दिलं आहे. तसचं नवनीत राणांवरही टिका केली.

खासदार नवनीत राणांबद्दल (MP Navneet Rana) बोलताना त्या म्हणाल्या “जिने 13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं तिच्यावर आम्ही काय बोलणार. आम्ही घरंदाज बायका तिच्यावर बोलणार नाही.”

आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल करत “शेजारच्या गल्लीत मांजरीला पिल्लं झाली तरी ती शिवसेनेमुळे (Shivsena) झाली असं शेलार म्हणतील एवढं त्याचं डोक फिरलं आहे.” असा टोला पेडणेकरांनी लगावला.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा उचलला. शिवसेनेनं मराठी माणसाचा विचार केलाय. सध्या मुंबईतील भाजपचे आमदार आणि खासदार सगळे अमराठी लोक आहे, असंही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

13 − 10 =