August 19, 2022

आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री

Read Time:2 Minute, 3 Second

मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्सचा’ पहिला सीझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सीझन आला. तोही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या एका व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे महेश आरवलेची. ही व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या कोणत्याही पोस्टर, टिझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते. त्याची ही सामाजिक नेत्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावत असून सोशल मीडियावर प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतूनही त्याच्यावर कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आदिनाथ कोठारे आपल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधील व्यक्तिरेखेविषयी म्हणतो, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते. हे गुपित प्रेक्षकांना आवडत आहे. याचा आनंद नक्कीच आहे. अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मॅसेजेस येत असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या आणि सगळ्यांच्या या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते तसेच अजून उत्तम काम करण्याचा हुरूप येतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 2 =

Close