June 29, 2022

आता समृद्धी महामार्गाच्या बाजूने धावणार बुलेट ट्रेन! रेल्वे अधिकार्‍यांची अधिकृत माहिती

Read Time:2 Minute, 31 Second

मुंबई-नागपुर अंतर कमी करण्यासाठी राज्यात समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. या समृद्धी महामार्गाच्या बाजूनेचा बुलेट ट्रेनसुद्धा धावणार असल्याच्या चर्चा अनेकदिवसांपासून होत होत्या. आता रेल्वे अधिकार्‍यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

राज्यातल्या १० जिल्ह्यांमधून जाणार्‍या समृद्धी महामार्गाच्या बाजूनेच ही बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रेल्वे अधिकार्‍यांकडून या हायस्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले आहे.

रेल्वेचे समाजविकास अधिकारी श्याम चौधरी यांनी जिल्हाधिकारी व ईतर वरीष्ठ अधिकार्‍यांसमोर हे सादरीकरण दिले आहे. लवकरच दहा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन व रेल्वे यासंबंद्धित कामांना सुरुवात करणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील १२७४ हेक्टर जमिन या प्रोजेक्टसाठी ऊपयोगात आणली जाणार आहे. हायस्पीड बुलेट ट्रेनच्या या प्रोजेक्टमुळे मुंबई-नागपुर अंतर केवळ साडेतीन तासांवर येणार आहे. एकावेळी ७५० प्रवासी या रेल्वेने प्रवास करु शकणार आहे.

रेप्वे अधिकार्‍यांनी यासंबंद्धित कामांना सुरुवात केली असून येत्या काही दिवसांतच संपूर्ण अहवाल सादर केला जाणार आहे. समृद्धी महामार्ग निर्मीतीचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. समृद्धी महामार्ग आणि हायस्पीड बुलेट ट्रेन यांमुळे मुंबई ही विदर्भातील लोकांच्या अगदी जवळ येणार आहे. परिणामी येथील विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

six + seventeen =

Close