
आता लसीकरण नोंदणीची गरज नाही
आज एकूण 4041 टेस्टिंग पैकी 210 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 110 आहे आज 235 बरे होऊन घरी गेले असून, आज 8 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने सोेमवार दि़ २४ मे रोजी लसीकरणाविषयी नवे नियम जारी केले असून, आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे़ यामुळे आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. त्यामुळे कोविन अॅपवर नाव नोंदणी करून अपॉईंटमेट घेण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवे नियम जारी केले असून, त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रोज लस देण्याची वेळ संपेल आणि शेवटी ज्या लस उपलब्ध राहतील त्या ऑनसाईट व्यवस्थेनुसार लोकांना दिल्या जातील. त्यामुळे लस वाया जाणार नाहीत. त्याचा उल्लेख कोविन प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे. ही नवीन सुविधा केवळ व्हॅक्सिनेशन सेंटरवरच असेल. अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
आता ऑनसाईट नोंदणी करावी लागणार
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दरम्यान, त्यांना cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.