August 19, 2022

आता राणा दाम्पत्यावरील आरोपाच्या चौकशीचा आदेश

Read Time:2 Minute, 32 Second

मुंबई : हनुमान चालिसा पठण प्रकरणामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युसुफ लकडवालाकडून ८० लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

मुंबईतील इस्लाम जिमखान्यात रोजा इफ्तार पार्टी पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थितीत होते. पत्रकारांशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा केली. खा. नवनीत राणा यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत. ईÞडीने आधीच युसुफ लकडावालाला अटक केली होती. त्यांनी ८० लाख रुपये घेतले, हे शपथपत्रात लिहिलेले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. आम्ही आधीच या प्रकरणाची चौकशी केली आहे. झेड सुरक्षा असताना हल्ला कसा झाला, याबद्दल चौकशी झाली पाहिजे. भाभा हॉस्पिटलचा त्यांच्या जखमेवर स्पष्ट रिपोर्ट आला आहे. अजून काय बोलायचे, असं म्हणत वळसे पाटील यांनी सोमय्यांना टोला लगावला.

शांतता बिघडवली तर
सहन करणार नाही
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादेत सभा घेणार आहे. पण कोणाच्याही सभेला महाविकास आघाडी सरकारचा विरोध नाही. समाजातील वातावरण कोणीही बिघडवू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. पण जर कुणी शांतता बिघडवली तर सरकार सहन करणार नाही, औरंगाबादेचे आयुक्त परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेतील, असेही वळसे पाटलांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven − eight =

Close