आता जनावरांच्या लम्पी आजारावरही मिळणार लस; ‘या’ महिन्यापासून लस येणार बाजारात

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 8 Second


मुंबई| गेल्या काही महिन्यांपूर्वी जनावरांना होणाऱ्या लम्पी व्हायरसनं(Lumpy Virus) देशात धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्रातही या व्हायरसमुळं अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळं सगळीकडं चिंतेचं वातावरण तयार झालं होतं.

Advertisements

नुकतेच ‘लम्पी प्रोव्हॅक’ या लशीचे तंत्रज्ञान सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मित संस्थेकडं देण्यात आलं आहे. त्यामुळं देशातील लम्पी व्हायरसच्या लशीचे पहिल्यांदा पुण्यात उत्पादन होणार आहे.

साधारण नोव्हेंबर महिन्यापासून या लशीच्या उत्पादनाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्येच ही लस राज्यातील जनावरांना देण्यास सुरू होईल, अशी शक्यता आहे. ही लस इतर राज्यांतही पुरविली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या आठवड्यात राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यात नागपूरमध्ये या संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या लशीचे तंत्रज्ञान पुण्यातील संस्थेकडं देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, लम्पी व्हायरसवरील लशीचे उत्पादन घेण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेतील अधिकारी हिसारमधील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्रात जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *