आता घरातही मास्क लावावे लागणार | देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला

Read Time:4 Minute, 19 Second

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने तर कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असून, आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून देशवासियांना सावध केले आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारचे उपाय वापरले जात आहेत. घराबाहेर पडताना लोकांना सतत मास्क लावा असे आवाहनही लोकांना केले जात आहे. याक्षणी बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत जे तुम्हाला संसर्गापासून वाचविण्यात उपयुक्त ठरू शकतात. कोरोनाची दुसरी लाट अधिक संक्रमक मानली जात आहे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी डबल मास्किंगवर अधिक जोर देत आहेत. दरम्यान, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने मास्कबद्दल काही खास गोष्टी नमूद केल्या आहेत, ज्या आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत. सीडीसीमधील तज्ज्ञांनी लोकांना डबल मास्किंगचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

मासिक पाळीतही लस घ्या
महिलांनी मासिक पाळीत लस घेऊ नये, त्यामुळे रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते. अशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे. मासिक पाळीतही महिला इंजेक्शन घेऊ शकतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा लवकरच
ऑक्सिजन टँकर्समध्ये जीपीएस लावण्यात आले आहेत. या टँकर्सची सरकार मॉनिटरींग करत आहे. शक्य तितक्या लवकर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रेमडेसिवीर संजीवनी नाही
रेमडेसिवीर इंजेक्शन हे संजीवनी नाही. रेमडेसिवीरला रामबाण औषध किंवा संजीवनी आहे, असे मानण्याचे कारण नाही. तो तुमचा गैरसमज असेल. त्यामुळे या इंजेक्शनचा साठा करणे योग्य नाही. कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला रेमडेसिवीर घेतल्याने काहीही फायदा होत नाही. सौम्य लक्षणे असतील तर इतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंटनेही रुग्ण बरा होतो. काढा, घरगुती उपा, वाफ घेणे, गुळणी करणे आदी गोष्टी केल्यानेही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेला रुग्म बरा होतो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

ऑक्सिजनसाठी काय कराल?
देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी नागरिकांनी आणि रुग्णांनी पोटावर झोपून श्वसनाचा व्यायाम करावा, अशी सूचनाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =