July 1, 2022

आता कोणीही घेऊ शकणार भाड्याने ट्रेन

Read Time:3 Minute, 34 Second

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने मंगळवार दि. २३ नोव्हेंबर रोजी एक मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयाअंतर्गत कोणतेही राज्य सरकार किंवा कंपनी ट्रेन भाड्याने घेऊ शकते. याबाबत रेल्वे मंत्रालयाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आली असून, या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार आहे. या योजनेंतर्गत, ३३३३ कोच म्हणजेच १९० गाड्या रेल्वेने निश्चित केल्या आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. भारत गौरव गाड्या भारताची संस्कृती आणि वारसा दर्शविणा-या थीमवर आधारित असतील. यासाठी सुमारे १९० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास गाड्यांची संख्या वाढविता येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. या गाड्या पर्यटन स्थळांसाठी चालविल्या जाणार आहेत. भारत गौरव ट्रेन, रामायण ट्रेनमुळे लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. रेल्वे येत्या काळात गुरुकृपा आणि सफारी ट्रेन चालविणार असल्याचेही रेल्वेमंत्री म्हणाले.

आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात
आजपासून या गाड्यांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एसी, नॉन एसी अशा सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल. याशिवाय रेल्वेचे मार्ग ठरविण्याचे अधिकार कंपनीला असतील. भारत गौरव ट्रेन खासगी क्षेत्र आणि आयआरसीटीसी या दोघांद्वारे चालविली जाऊ शकते आणि या गाड्यांचे भाडे टूर ऑपरेटर ठरविणार आहे.

किती गाड्या असणार?
रेल्वे मंत्रालयाने आणलेल्या सदर योजनेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आली असून, या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत, ३३३३ कोच म्हणजेच १९० गाड्या रेल्वेने निश्चित करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

पर्यटन स्थळांसाठी चालविण्यात येणार गाड्या
सदर योजनेतील गाड्या पर्यटन स्थळांसाठी चालवण्यात येणार आहेत. यावेळी रेल्वेमंत्री म्हणाले की, भारत गौरव ट्रेन, रामायण ट्रेनमुळे लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. रेल्वे येत्या काळात गुरुकृपा आणि सफारी ट्रेन चालवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

15 + two =

Close