आता कियारा-सिद्धार्थचंही ठरलं; ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 47 Second


मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani)रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. ते दोघं ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या जोडीचे असंख्य चाहते आहेत.

Advertisements

नुकतीच त्यांच्या लग्नाबाबत(Sidharth-Kiara Marriage) मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कियारा-सिद्धार्थ 2023 मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाची माहिती मिळताच त्यांचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

कियारा-सिद्धार्थ 6 फेब्रुवारी लग्नगाठ बांधणार आहेत. तसेच लग्नाच्या आधी म्हणजेच 5 आणि 6 तारखेला संगीत, मेहंदी, हळदीचे कार्यक्रमही धुमधडाक्यात होणार आहेत. जैसलमेर हाॅटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

सिद्धार्थ-कियाराला बऱ्याचदा एकत्र स्पाॅट केलं गेलं आहे. नुकतेच ते मनिष मल्होत्राच्या पार्टीमध्ये मीडियाला एकत्र पोज देताना दिसले होते.

दरम्यान, सिद्धार्थ लवकरच रश्मिका मंदानासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. तर कियाराचा RC15 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *