January 21, 2022

‘आझादी का अमृतमहोत्सव’ पुण्यात

Read Time:2 Minute, 31 Second

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्यासाठीच्या लसीकरणाचा मेगाप्लॅन सांगितला. अजित पवारांनी यावेळी कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन, मराठवाड्यात झालेले नुकसान आणि हायवेच्या जमिनींचे संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुणे शहरात आणि ग्रामीण भागात आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ७५ तास लसीकरण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ३० सप्टेंबर, १ आणि २ ऑक्टोबर या तीन केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत पुण्यात येत्या काही दिवसांत विधानसभा मतदारसंघनिहाय ७५ तास लसीकरण केले जाईल. पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्यात आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ७५ तास लसीकरण उपक्रम राबवला जाईल.

ग्रामीण भागाला डीपीडीसीतून निधी देणार
खासदार अमोल कोल्हे खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीएसआरमधून ५ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. ग्रामीण भागात डीपीडीसीच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून सिरींज देणार आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता नाही
राज्यात आता ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत. शाळांमधून कोविड प्रोटोकॉल सांगण्यात यावा. शाळा ४ तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पालक अजून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही, दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 5 =

Close