आज वसुुंधरा दिनी गोदावरी नदीत सापडले हजारो मृत्यू मासे


नांदेड(प्रतिनिधी)-आज जागतिक वसुंधरा दिन असतांना शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत हजारो मासे मृत आढळून आले आहेत. पाण्याविषयी तज्ञ असणाऱ्याा लोकांनी सांगितले की, शहरातील बरेच नाले गोदावरी नदीत सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असेल.

आज जागतिक वसुंधरा दिन असतांना वसुंधरेबाबत सर्वांनी जागरुक राहुन वसुंधरेला उत्कृष्ट ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असतांना आजच गोदावरी नदी पात्रात हजारो मृत मासे साापडले. गोदावरी नदीत अनेक नाल्यांचे पाणी सोडले असल्यामुळे त्यातून होणाऱ्या प्रदुषणामुळे या माशांचा मृत्यू झाला असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

या पुर्वी सुध्दा अशा प्रकारे हजारो माशांचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस क्रेन लावून मृत माशांचा साठा उचलावा लाागला होता. त्यावेळी नदीतील पाण्याचे नमुने घेवून ते तपासणी साठी पाठविले होते. त्याचा अहवाल अनेक वर्षानंतर सुध्दा आजपर्यंत आलेला नाही. झालेल्या घटनेचा फक्त आज संपविण्यामध्ये प्रशासन गर्क असते. पण त्याचाअंतिम निर्णय कधीच घेतला जात नाही.


Post Views: 45


Share this article:
Previous Post: विधी सेवेमार्फत एका दिवसात प्रकरण चालवून आरोपीची निर्दोष मुक्तता 

April 22, 2024 - In Uncategorized

Next Post: 24 एप्रिलला उमेदवारांच्या खर्चाची अंतिम तपासणी – VastavNEWSLive.com

April 23, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.