‘आज मैंने मूड बना लिया है…’, अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याची होतेय जोरदार चर्चा

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 38 Second


मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnvis) या नेहमीच चर्चेत येत असतात. शुक्रवारी अमृता फडणवीसांचं नवीन गाणं(Amruta Fadnvis New Song) लाॅंच होणार आहे, या निमित्तानं त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Advertisements

अमृता यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. हे गाणं पंजाबी भाषेतील आहे. या गाण्याचं नाव ‘आज मैंने मूड बना लिया ए ए ए’, असं आहे. या गाण्याच्या टीजरचा व्हिडीओही त्यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.

सध्या अमृतांच्या या नवीन गाण्यावरून सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. अनेकजण कमेंट्स करत त्यांच्या या गाण्याचे कौतुक करत आहेत.

हे गाणं शुक्रवारी रिलीज होणार आहे. त्यामुळं अमृतांच्या चाहत्यांना या गाण्याची मोठी उत्सुकता लागली आहे. महत्वाचं म्हणजे अमृताजींचं पंजाबी भाषेतील हे पहिलचं गाणं असणार आहेत.

दरम्यान, अमृताजींच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग असला तरी त्यांना त्यांच्या आवाजावरून बऱ्याचदा नेटकरी ट्रोल करत असतात.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *