“आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल”

Read Time:2 Minute, 2 Second


मुंबई | शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणी संग्रहालयातील प्राणी आहे, अशी टीका मनसेकडून केली जात आहे. या राजकीय वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता.

पवारांनी मनसेच्या मर्मावर बोट ठेवत या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देत टोला लगावला. प्राणी वगैरे संदर्भातील उल्लेख मी इथं करणार नाही, असं पवार म्हणाले.

साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?, असं म्हणत शरद पवार यांनी मनसेवर टीकास्त्र सोडलं.

शरद पवारांनी केलेल्या टीकेला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही धनसे कमी आहोत, पण मनसे लई आहोत, असं राजू पाटील ( Raju Patil ) म्हणालेत.

आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल, असा टोला राजू पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे.

दरम्यान, संधी सर्वांना मिळते, असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. तसेच शरद पवार यांना आदर देतोय, आदर घ्या, असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published.

two + six =