January 21, 2022

आजी , माजी , भावीवरून तर्क-वितर्क

Read Time:6 Minute, 15 Second

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने शुक्रवार १७ सप्टेबर रोजी औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहका-यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

मला माजी मंत्री म्हणू नका : चंद्रकांत पाटील गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा अर्थ लावला जात आहे. पुण्यात एका खासगी दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला माजी मंत्री न म्हणण्याचा उल्लेख केला होता. ‘मला माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांत कळेल तुम्हाला’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा असावा : दरेकर
या विधानावरून तर्क करणे योग्य नाही. काल चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केले, त्यावर उद्धव ठाकरेंनी केलेली ही मिश्किल टिप्पणी आहे. त्यातून आलेले हे विधान मला वाटत आहे. ते जरी गांभीर्याने घ्यायचं झालं, तर उद्या भाजपासोबत जायचे झाले, तर माझी तयारी आहे, असे त्यांना म्हणायचे असावे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कुरघोडीचे राजकारण करू नये, मला भाजपासोबत जाण्याचा पर्याय खुला आहे, हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा.’

भाजपा खूप तणावग्रस्त : पटोले
मुख्यमंत्र्यांना गंमत करायची सवय आहे. त्यानुसारच ते बोलले, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत लोकांमध्ये ताणतणाव आहे. मुख्यमंत्र्यांची आधीपासूनच थट्टामस्करी करण्याची सवय आहे. आजही त्यापद्धतीने त्यांनी जोक केला, गंमत केली. शेवटी ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा ते त्यांच्या हातात आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे चालणार असा विश्वास आहे. त्यांनीही तो ब-याचदा बोलून दाखवले आहे. त्यामुळे मला नाही वाटत की हे विधान फारसे गांभीर्याने घ्यावे.सध्या भाजपा खूप तणावग्रस्त आहेत. त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असावा.

मनातील भावना बोलून दाखवली : फडणवीस
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौ-यावर आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्याच्या मनात काय हे मी कस सांगू?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भावी सहकारी’ म्हणत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यासोबतच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत. त्यातच मुख्यमंर्त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावे हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + 17 =

Close