आजादी गौरव पदयात्रेतून देशभक्तीचे चैतन्य

Read Time:3 Minute, 59 Second

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत युवकांचा दिवसेंदिवस सहभाग वाढत असल्याने आझादी गौरव पदयात्रेने शहरात देशभक्तीचे चैतन्य निर्माण केले आहे. बुधवारी या पदयात्रेची सुरुवात मराठवाडा मुक्ती संग्रामच्या इतिहासाची साक्ष असलेल्या गंजगोलाई येथून जगदंबा मातेची आरती करुन दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा दयारामरोड, खडक हनुमान, तेलीगल्ली, पटेल चौक कॉर्नर, सूळ गल्ली, भाजी मार्केट, सेंट्रल हनुमान, आजाद चौक, औसा हनुमान या मार्गाने मार्गक्रम करीत शेवटी महात्मा बसवेश्वर महाविदयालय येथे पोहोचली. या ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन, अभिवादन करुन समारोप करण्यात आला. आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आल्यामुळे लातूर शहरातील वातावरण स्वातंत्र्य आंदोलन, देशभक्ती व थोर हुतात्म्यांचे बलीदानाच्या आठवणीने भारावून गेल्याचे चित्र सर्वांना पहायला मिळाले.

या पदयात्रेत अ‍ॅड. किरण जाधव, मोईजभाई शेख, अ‍ॅड. समद पटेल, अ‍ॅड. दीपक सूळ, प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, सपना किसवे, अशोक गोविंदपूरकर, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, अ‍ॅड. किशोर राजुरे, गणपतराव बाजुळगे, इम्रान सय्यद, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, अ‍ॅड. फारुख शेख, प्रा. प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, सुपर्ण जगताप, व्यंकटेश पुरी, दगडुअप्पा मिटकरी, युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, दीप्ती खंडागळे, वर्षा मस्के, हमीद बागवान, कुमारप्पा पारशेट्टी, सुंदर पाटील कव्हेकर, सिकंदर पटेल, पंडित कावळे, कलीम शेख, इसरार पठाण, अरफात पटेल, अक्षय मुरळे, सुलेखा कारेपूरकर, स्वाती जाधव, शीतल मोरे, केशरबाई महापुरे, शीला वाघमारे, मनीषा पुंड, कमलबाई मिटकरी, मीना टेकाळे, मंदाकिनी शिखरे, अनिता रसाळ, अभिषेक पतंगे, अभिजित इगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे, आसिफ तांबोळी, सिद्धांत कांबळे, करीम तांबोळी, महेश शिंदे, गिरीश ब्याळे, राजू गवळी, संदीपान सूर्यवंशी, विकास कांबळे, कुणाल वागज, मेनोद्दीन शेख, रणधीर सुरवसे, आयुब मणियार, पवन सोलंकर, विष्णुदास धायगुडे, अ‍ॅड. सुनीत खंडागळे, पवनकुमार गायकवाड, विजयकुमार धुमाळ, रोहित वारडुले, दिनेश गोजमगुंडे, जहिर शेख, अमन सय्यद, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, जाफर शेख, जफर पटवेकर, जय ढगे, युसूफ शेख, महेश कोळे, राहुल डुमणे, सादिक पटवारी, इनायात सय्यद, अ‍ॅड. दिनेश राइकोडे, प्रभुअप्पा इंडे, जमालोद्दीन मणियार, अशोक भंडारे, संजय सुरवसे आदी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × three =