आजपासून महाराष्ट्र अनलॉक! पाच टप्प्यांमध्ये होणार अनलॉक, जाणुन घ्या तुमचा जिल्हा कुठल्या टप्प्यात येतो? काय सुरु? काय बंद?

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा वेग अोसरत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमिवरच महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करणार आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पार पडली असून, यामध्ये अनलॉकबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र अनलॉक होणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, अौरंगाबाद, जालना, बुलढणा, जळगाव, नाशिक, धुळे, लातुर, नांदेड, परभणी, ठाणे, नागपुर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृह, सार्वजनीक कार्यक्रम, लग्नसोहळा, सार्वजनीक कार्यलयं सर्व क्षमतेनिशी सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

दुसर्‍या टप्प्यात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये मुंबई शहर आणि ऊपनगर, अहमदनगर, नंदुरबार, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दुसर्‍या टप्प्यातील जिल्ह्यांत ५० टक्के क्षमतेची मर्यादा घ‍ालण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये लोकलला मात्र परवानगी नसणार आहे. सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ९ स्पोर्ट्सला मान्यता असणार आहे. तसेच सायकलींग आणि मॉर्नींग वॉकलासुद्धा मान्यता आसणार आहे.

तीसर्‍या टप्प्यामध्ये कोल्हापुर, सोलापुर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, ऊस्मानाबाद, अकोला या १० जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने ऊघडी असणार आहे. शनिवार ते सोमवार सकाळ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ईतर दुकाने बंद असणार आहे.

चौथ्या टप्प्यामध्ये पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांतील निर्बंध कायम असणार आहे. २५ टक्के ऊपस्थितीसह सरकारी आणि खाजगी कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यात पॉझीटीव्हिटी रेट २० टक्के आणि अॉक्सीजन बेड २५ टक्क्यापेक्षा जास्त व्यापलेले असेल अशा जिल्ह्यांना रेड झोनमध्ये टाकुन निर्बंध कायम असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × two =

vip porn full hard cum old indain sex hot