आघाडी सरकारकडून शहरासाठी १०० कोटी

Read Time:2 Minute, 45 Second

नांदेड : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी १०० कोटीचा भरीव निधी पालकमंत्र्यांनी खेचून आणला असल्याची माहिती नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आ. बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. माजी मुख्यमंत्री यांच्याकडेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यभार देतांना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी विकासकामांचा झपाटा सुरू केला. कोरोना महामारीच्या काळात नांदेड शहरासाठी महा विकास आघाडी सरकारने काही महिन्यांपूर्वीच ५० कोटीचा निधी दिला होता.

आता पुन्हा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शहरातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणखी अतिरिक्त निधीची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशिर्षकाखाली राज्याच्या नगरविकास विभागाकडून तब्बल १०० कोटी रुपये नव्याने मंजूर करुन घेतले आहेत. या निधीमुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यासह विविध विकासकामे पुर्णत्वास जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे आ. बालाजी कल्याणकर यांनी आभार मानले आहेत.

तसेच या पुढील काळात देखील महा विकास आघाडी सरकारकडून नांदेड शहरासाठी व जिल्ह्यासाठी भरीव असा निधी मिळणार आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेळोवेळी निधी खेचून आणण्याचे काम करणार आहोत. असे देखील आ. बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + 8 =