आगीत होरपळून १८ मजुरांचा मृृत्यू

Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 33 Second

पुणे : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट एमआयडीसीतील उरवडे गावच्या हद्दीतील एसव्हीएस कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर २० कामगारांना वाचविण्यात यश आले. होरपळलेल्या मजुरांची ओळख पटविणेदेखील कठीण झाल्याचे सांगण्यात आले. या कंपनीत केमिकल बनविण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कंपनीत आग धुमसत होती. त्यामुळे बचाव कार्याला अडथळे निर्माण झाले होते.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. यासोबतच रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या होत्या. मुळशी तालुक्यातील उरवडे येथील कंपनीत ही आग लागली. या कंपनीत केमिकल बनविण्यात येत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे आतमध्ये अडकलेल्या कामगारांत काही महिलांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

Advertisements

या कंपनीत बरेच मजूर काम करत होते. त्यापैकी १८ मजूर होरपळून मृत्यूमुखी पडले, तर २० मजूरांना बाहेर काढण्यात यश आले. तत्पूर्वी कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाठी जीसीबीने भिंतीही फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बरेच मजूर बाहेर पडू शकले. या कंपनीत आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतर कामगारांचा शोध घेतला जात असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी चौकशी समिती नेमली असल्याचे सांगण्यात आले.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ७ लाखांची मदत
आगीची घटना आणि त्यात १८ कामगारांचा बळी ही घटना अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली, तर केंद्र सरकारनेही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे जाहीर केले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *