आकाशवाणीचे जेष्ठ निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचे निधन

Read Time:2 Minute, 35 Second

 12 वाजता होणार अंत्यसंस्कार

नांदेड : विजयनगर येथील रहिवाशी तथा आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रासंगिक निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचे आज १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले, ते ५१ वर्षाचे होते.

गौतम पठ्ठेबहादूर हे नांदेड आकाशवाणी केंद्रात १९९४ पासून प्रासंगिक उद्घोषक म्हणून कार्यरत होते. तरंग आणि त्यानंतर सप्तरंग रेडिओ ॲपचे ते संचालक होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आकाशवाणी व सप्तरंग रेडिओवर विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती, फर्माईश, थेट बांधावरून, शेती संवाद, श्रोता संवाद अशा कार्यक्रमांनी त्यांनी आपल्या धीरगंभीर आवाजाने त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. नैमातिक उद्घोषक व संकलक यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. नैमातिक उद्घोषक व संकलक संघटनेचे ते अध्यक्ष होते. प्रमाणित लेखा परीक्षक म्हणूनही ते नांदेडकरांना सुपरिचित होते. सयंमी, मितभाषी, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून असंख्य मित्र जोडणाऱ्या गौतम पठ्ठेबहादूर यांचे अनेक क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. तब्बल २८ वर्ष आपल्या दमदार आवाजाने आणि बहारदार सादरीकरणाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचा आवाज आज सायंकाळी कायमचा शांत झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, भाऊ व बहिणी असा मोठा परिवार आहे. दिवंगत गौतम पठ्ठेबहादूर यांच्या पार्थिव देहावर उद्या दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गवर्धन घाट स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

15 + 7 =