आंबुलगा गावात बस चालक आणि बस वाहकास मारहाण – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-आंबुलगा गावात बस चालक आणि बस वाहकास मारहाणा करणाऱ्या दोन जणांविरुध्द कंधार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ब्रम्हाजी शिवाजी मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जून रोजी ते कंधार आगाराची बस क्रमांक एम.एच.14 बीटी 1506 घेवून मुखेड ते कंधार मार्गे पेठवडज असा प्रवास करत असतांना आंबुलगा गावाजवळ सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास असा प्रकार घडला की, बसमध्ये प्रवासी जास्त असल्याने काही प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळाला नाही. पुढे केवला तांडा येथे गोविंद दत्तात्रय टेंभुर्णे आणि भिमराव गुंडे या दोघांनी बस समोर दुचाकी आडवी उभी करून बस थांबवली. तुम्ही आमच्या गावाचे पुर्ण प्रवाशी घेवून का आले नाहीत असे म्हणून त्यांच्या हातातील पाईपने त्यांना आणि वाहकाला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा, रस्ता रोखणे, शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणे आदी सदरांखाली पोलीस ठाणे कंधार यांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 184/2024 नुसार दाखल केला आहे. याचा तपास पोलीस अंमलदार काळे करीत आहेत.


Post Views: 314


Share this article:
Previous Post: अत्यंत धुरंधर तपासिक अंमलदार असतांना एक कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयात पोलीस कोठडी नामंजूर;अनेक ताशेरे ओढत प्रकरणातील आरोपीनां जामीन दिला

June 14, 2024 - In Uncategorized

Next Post: सरसम हायवे पुलावर सापडलेल्या जखमी युवकाचा खूनच – VastavNEWSLive.com

June 14, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.