January 19, 2022

आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध?

Read Time:2 Minute, 21 Second

नवी दिल्ली : केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने नुकताच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १५ डिसेंबरपासून ही विमान वाहतूक सुरू होणार होती. मात्र, आता नव्या व्हेरिएंटने पुन्हा जगाची चिंता वाढविली असून, भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे पुन्हा आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध येऊ शकतात.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत याबाबत फेरविचार करण्याचे संकेत देण्यात आले. या अगोदर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत २० महिन्यांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विमानांची व्यापारी उड्डाणे सुरू होणार होती. मात्र, आता या निर्णयावर फेरविचार करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

यासोबतच जोखीम कक्षेत असलेल्या देशांतून येणा-या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. बंदर, विमान तळावर तैनात अधिका-यांना तपासणी प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे, तर देशाअंतर्गतही कोरोनाच्या संसर्गावर बारीक नजर ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे यापुढे कोरोनाचा फैलाव होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले असल्याचे केंद्रीय गृह सचिवांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 17 =

Close