January 19, 2022

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य

Read Time:1 Minute, 55 Second

नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत असून, खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या प्रवाशांना भारतात आल्यानंतर ७ दिवसांसाठी होम क्वारंटाईन अनिवार्य करण्याचा आदेश दिले आहेत. सात दिवसांनंतर आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, हे आदेश ११ जानेवारी २०२२ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

१ डिसेंबरपासून लागू झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ११ देशांना जोखीममध्ये समाविष्ट करण्यात आले होते, त्यात यूके, युरोपमधील देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश करण्यात आला होता, आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, त्यात आणखी ९ देशांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या देशांमध्ये घाना, टांझानिया, काँगो, इथिओपिया, कझाकिस्तान, केनिया, नायजेरिया, ट्युनिशिया आणि झांबिया यांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + 4 =

Close