अहमदाबादमधील छाप्यात पाचशे कोटींचे व्यवहार उघड…

Read Time:1 Minute, 24 Second

नवी दिल्ली : आयकर विभागाने अहमदाबादमधील एका बांधकाम व्यवसायिकाच्या तसेच त्याच्याशी संबंधीत ठिकाणांवरील छाप्यात पाचशे कोटी रूपयांचे करचुकवेगीरीचे व्यवहार उघड झाले आहेत.
हा व्यावसायिक आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या ब्रोकरच्या २२ ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले. त्यात एकूण पाचशे कोटी रूपयांचे व्यवहार बेकायदेशीरपणे झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती आयकर विभागाच्या अधिका-यांनी दिली.

या छाप्याच्यावेळी सुमारे १ कोटी रूपयांची रोकड आणि ९८ लाखांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. या लोकांची २४ लॉकर्सही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यातून आणखीही काही घबाड हाती लागण्याची शक्­यता आहे असेही आयकर अधिका-यांचे म्हणणे आहे. या व्यावसायिकांनी जमिनींमध्ये दोनशे कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचीही कागदपत्रे आयकर अधिका-यांच्या हाती लागली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 4 =