असे चित्रपट पाहण्यात जनतेने पैसा, वेळ का वाया घालवावा?

Read Time:2 Minute, 22 Second

मुंबई : स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणा-या कमाल आर. खानने याआधीच ‘विक्रम वेधा’ला आपत्ती म्हटले होते. याशिवाय त्याने वरुण धवनच्या आगामी ‘भेडिया’ या चित्रपटावरही निशाणा साधला आहे. ‘भेडिया’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचे निर्माते आजही त्याच धर्तीवर चित्रपट बनवत असल्याचे के. आर. के.ने म्हटले आहे.

‘विक्रम वेधा’च्या शुक्रवारच्या कलेक्शनचे आकडे आले आहेत, जे अपेक्षेपेक्षा कमी आहेत. चित्रपटाने १०.५० कोटींची ओपनिंग केली आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा मसाला चित्रपट ‘विक्रम वेधा’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. ‘दुस-या दिवशीचे सकाळचे शो ९० टक्के रिकामे आहेत’, असे केआरकेने ट्विटमध्ये लिहिले आहे.

‘आज भारतभर ‘विक्रम वेधा’चे ९० टक्के मॉर्निंग शो रद्द करण्यात आले आहेत. दुपारचे शो पहिल्या दिवसाच्या तुलनेत ५० टक्के रिकामे आहेत. अवघ्या २ दिवसांत हा चित्रपट आपत्ती ठरला आहे. हा चित्रपट २५० कोटींत तयार झाला. हृतिक रोशन, भाईजानचे खूप खूप अभिनंदन’ असेही केआरकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.

केआरकेने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, जर आजच्या काळात निर्माते ‘भेडिया’ आणि ‘विक्रम वेधा’सारखे चित्रपट बनवत असतील तर ते चित्रपट न पाहिल्याबद्दल जनतेला दोष कसे देऊ शकतात? असे फालतू आणि बेताल चित्रपट पाहण्यात जनतेने पैसा आणि वेळ का वाया घालवावा? बॉलिवूडला वाचवायचे असेल तर हा मूर्खपणा थांबवा.
‘भेडिया’च्या टीझरवर केआरके म्हणाला, काल मी ‘भेडिया’चा टीझर पाहिला. देवाची शपथ बघून चक्कर आल्यासारखं झालं. मला ८०-९० च्या दशकातील रॅमसे चित्रपटांची आठवण झाली. वरुण भैय्याचे अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve − three =